अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- बिग बॉस या रियालिटी टीव्ही शोमध्ये झळकलेली एक अभिनेत्री सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. यापूर्वी बिग बॉसमधला सहस्पर्धक कुशाल टंडन याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्यांचं नातं खूप दिवस टिकले नाही.
त्यानंतर आता तिच्याहून 12 वर्षांनी लहान असलेल्या तरुणाला डेट करत असल्याने चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री म्हणजे बिग बॉसच्या सातव्या पर्वाची विजेती अभिनेत्री गौहर खान आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार गौहर खान सध्या एका संगीतकाराच्या मुलाला डेट करत आहे. या संगीतकाराचं नाव इस्माईल दरबार असून त्यांच्या मुलाचं नाव जैद असं आहे.
जैद आणि गौहर हे एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात. अद्याप दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिलेली नाही. मात्र, सोशल मीडियातून ती नेहमी पोस्ट टाकत असते.
त्यामुळे तिच्या आणि जैद सोबतच्या नात्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. जैद हा अभिनेता, डान्सर आणि कंटेंट क्रिएटर म्हणून काम करतो. तो सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने गौहरसोबत सेल्फीही शेअर केला होता.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved