अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-दिल्लीतील शेतकऱ्यांच्या नियोजित ट्रॅक्टर रॅलीने हिंसक वळण घेतल्यानंतर आता मोदी सरकारकडून काही कडक पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता दिल्लीच्या काही भागांमधील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा बंद करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने काही वेळापूर्वीच स्थानिक प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत. आंदोलन हिसंक होऊ लागल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीतील पाच परिसरात इंटरनेट बंद राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हिंसाचारामुळे दिल्लीतील सिंघु बॉर्डर, गाझिपूर बॉर्डर,
टिकरी बॉर्डर, मुकरबा चौक आणि नांगलोई परिसरात आज रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. दरम्यान दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांच्या हिंसाचारामुळे केंद्र सरकारने येथील परिस्थिती पाहता दिल्ली आणि सीमेच्या परिसरात सीआरपीएफच्या 15 कंपन्या तैनात केल्या जाणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. ही बैठक जवळजवळ दोन तास चालली. या बैठकीदरम्यान, आयबी निर्देशक आणि गृह सचिव यांच्यासह अधिकारी यांची सुद्धा उपस्थिती दिसून आली. बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, संवेदनशील ठिकाणी सीआरपीएफच्या तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत.
सुत्रांनुसार गुप्तचर यंत्रणांना अद्याप हिंसा होऊ शकतो अशी शंका आहे. दरम्यान दिल्ली शहरातील अनेक भागात पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे आणि लाठीचार्ज केला. संतप्त शेतकऱ्यांनी एका बसची तोडफोडही केली.
राजपथ येथील प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर दिल्ली पोलिसांनी काही मार्गांवर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर परेड करण्यास परवानगी दिली होती. राजधानीच्या सिंघूआणि टिकारी सीमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांच्या काही गटांनी मंगळवारी सकाळी पोलिसांनी टाकलेले बॅरिकेट्सही मोडले आणि दिल्लीत प्रवेश केला
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved