Shukrayaan-1 : चंद्र, सूर्यानंतर आता शुक्रयानची तयारी

Ahmednagarlive24 office
Published:
Shukrayaan-1

Shukrayaan-1 : चंद्र, सूर्यानंतर इस्रो पृथ्वीचा जुळा ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्र ग्रहावर यान पाठवण्याची तयारी करत आहे. सूर्यमालेतल्या जवळपास सर्वच ग्रहांवर सजीवसृष्टी आहे की नाही, किंबहुना सजीवसृष्टीला पोषक वातावरण आहे की नाही, याचा शोध सुरू आहे. ही मोहीम त्यातलाच एक भाग आहे.

जवळपास दहा हजार वर्षांनी आताची पृथ्वी ही फार वेगळ्या अवस्थेला असेल. त्यावेळच्या मनुष्यांवर इतर ग्रहांवर वस्ती करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळेच इतर ग्रहांवर सजीवसृष्टीचा शोध सुरू आहे.

शुक्राच्या वातावरणाच्या वरच्या आवरणात सूक्ष्म स्वरूपात जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रयान-१ ही महत्त्वाची मोहीम ठरण्याची शक्यता आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचे व्हीनस एक्स्प्रेस, जपनाच्या अकाटसुकी व्हीनस क्लायमेट ऑर्बिटर आणि नासाच्या पार्कर सोलर प्रोब मिशनने आतापर्यंत शुक्राचा दौरा केला आहे.

शुक्रावर सूर्याचा प्रकाश पडून मोठ्या प्रमाणावर परावर्तीत होतो त्यामुळे तो इतरांपेक्षा जास्त तेजस्वी दिसतो. शुक्रावरच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड असावा. त्यात पाण्याची वाफ नाही. तिथले ढग गंधकयुक्त आम्लाने तयार झालेले आहेत.

या ग्रहाच्या पृष्ठभागावर पृथ्वीपेक्षा ९२ पट दाब जास्त आहे. थोडक्यात सर्वसामान्य माणूस या ग्रहावर जीवन जगू शकत नाही. पृष्ठभाग ४८२ अंश सेल्सियस तापमानाने तापतो. त्याचा पृष्ठभाग खडकाळ आहे.

त्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासापेक्षा ६६० किलोमीटरने कमी आहे. सूर्याजवळचा असल्याने या ग्रहावर सूर्य पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो. शुक्राला एकही उपग्रह नाही. त्याला स्वतःभोवती फिरण्यास २४३, तर सूर्याभोवती फिरण्यास २२५ दिवस लागतात. म्हणजेच त्याच्यावरचा एक दिवस हा त्याच्या एक वर्षाहून मोठा आहे.

शुक्र हा सूर्यमालेतला आश्चर्य वाढवणारा ग्रह आहे. शुक्रावर पृथ्वीसारखेच वातावरणाचे आवरण आहे. ते काहीसे घट्ट किंवा जाडसर असे आहे. ते आम्लधर्मी दिसते. त्याचा अभ्यास करणे तितकेच रंजक ठरणार आहे.- एस. सोमनाथ, प्रमुख, इस्रो

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe