Electric Scooter : जर तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. बाजारात एक जबरदस्त स्कूटर आली आहे. जी तुम्ही फक्त 17 हजार रुपयांमध्ये खरेदी करून तिचे मालक बनू शकता.
इंधनाच्या किमती अधिक वाढल्याने अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. तसेच अनेक कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहने तयार करायला जास्त प्राधान्य देत आहेत. तुम्ही देखील कमी किमतीमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता.
थंडरबोल्ट इलेक्ट्रा ची वैशिष्ट्ये
या स्कूटरमध्ये धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. या स्कूटरला 60V चार्जर देण्यात आला आहे. या स्कूटरवर तुम्ही 150 किलो पर्यंत वजन घेऊन जाऊ शकता. या स्कूटरमध्ये लिथियम आयर्न बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 2.4KV ची आहे.
थंडरबोल्ट इलेक्ट्रा किंमत
जर तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याची दिल्लीमधील एक्स शोरूम किंमत 80000 रुपये देण्यात आली आहे. जी तुम्हाला 83763 रुपयांमध्ये मिळेल.
ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही फक्त १७ हजारांमध्ये खरेदी करू शकता. १७ हजार रुपयांचे डाउनपेमेंट करून या स्कूटरचे मालक बनू शकता. ही स्कूटर खरेदी करण्यासाठी फायनान्स कंपन्या ऑफर देत आहेत.
जर तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर फायनान्स वर खरेदी केली तर तुम्हाला दरमहा 3764 रुपयांचा हफ्ता भरावा लागेल. यासाठी तुम्हाला ३ वर्षाची परतफेड करावी लागेल. फायनान्स वर जर तुम्ही ही स्कूटर खरेदी केली तर तुम्हाला ही स्कूटर 99,963 रुपये द्यावे लागतील.