अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-सध्या कोरोना वायरस मुळे लोकांचे हॉटेल मध्ये जाणे,पार्ट्या करणे,बँक मध्ये जाणे तसेच इतर विविध गोष्टी करण्याचे प्रमाण फार कमी झाले.
कोरोना काळात ऑनलाईन प्लॅटफॉर्म मात्र जोरात धंदा करत होते मग ते ऑनलाईन गेमिंग असो वा ओटीटी प्लॅटफॉर्म वर चित्रपट अथवा वेब सिरीज पाहणे असो.
या काळात ऑनलाईन शॉपिंग करण्याचा टक्का सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे ऑनलाईन बँकिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली.
वाढलेल्या बँकिंग मुळे सायबर गुन्हे होण्याचे प्रमाण देखील वाढले. लोक मोठ्या मोठ्या ऑफर्स ला बळी पडतात आणि याचा फायदा सायबर गुन्हेगार हे घेत असतात.
ऑनलाईन फ्रॉड पासून वाचवण्यासाठी आता स्टेट बँक ऑफ इंडिया ने मोलाचा सल्ला दिला आहे.सध्या अनेक लोक एसबीआयच्या नावाने फेक फोन करतात आणि विविध प्रकारच्या भुलवणाऱ्या ऑफर्स देतात.
त्यामध्ये आपल्याला आपला फोन नंबर,वैयक्तिक माहिती विचारून आपल्या बँक अकॉऊंट मधून आपले पैसे काढून घेतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा असा फोन आला तर सावध राहा आणि आपली खासगी माहिती शेअर करू नका,
असं बँकेच्या वतीने आपल्याला सांगितले आहे. नाही तर तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सर्वानी ऑनलाईन बँकिंग चा जपून वापर करावा.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved