अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठक केली. या बैठकीत कॉंग्रेस नेत्यांनी राहुल गांधींनी पक्षाची सूत्रे स्वीकारली पाहिजेत, असे मत व्यक्त केले.
या बैठकीत कॉंग्रेस पक्षाला बळकट करणे आणि नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणे या विषयांवर चर्चा झाली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक पुढच्या वर्षी जानेवारीच्या शेवटी होणार आहे.
दरम्यान या आयोजित बैठकीनंतर पवन बंसल म्हणाले कि, पक्षाला राहुल गांधी यांची गरज आहे. बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांनी आपले मत मांडले.
बैठकीत सोनिया गांधींसह एकूण 19 नेते उपस्थित होते. कॉंग्रेसच्या धोरणांवर नाराज असलेले नेते देखील या वेळी उपस्थित होते.
कॉंग्रेस नेत्यांनी राहुल गांधींनी पक्षाची सूत्रे स्वीकारली पाहिजेत, असे सांगितले. यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पक्ष जबाबदारी देईल ती स्वीकारण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे,.
दरम्यान ऑगस्ट महिन्यात गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि कपिल सिब्बल यांच्या सहित कॉंग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाला सक्रिय अध्यक्षाची गरज आणि व्यापक संघटनात्मक बदल करावा अशी मागणी केली होती.
यावर काही काँग्रेस नेत्यांनी गांधी परिवाराच्या वर्चस्वाला आव्हान दिलं गेलं असल्याचं मत व्यक्त केलं होतं. अनेकांनी गुलाम नबी आझाद यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली होती.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये