Winter Tourist Places In India:- सध्या सगळीकडे गारवा पसरला असून आता सध्या हिवाळा सुरू असल्याने राज्यातील बऱ्याच भागांमध्ये किमान तापमानात घट झाल्याचे चित्र आहे. आता नोव्हेंबर महिना सुरू असून जवळपास नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आहे व आता दोन ते तीन दिवसात डिसेंबर महिन्याला सुरुवात होणार असून येणाऱ्या काळात पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे.
अशा या गारवा आणि थंडगार असलेल्या वातावरणामध्ये अनेक जणांना फिरायला जायला आवडते. खास करून अशा प्रकारे फिरायला जाण्याचे प्लान हे कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत आखले जातात. तसेच हिवाळ्यामध्ये बरेच लोक हे ज्या ठिकाणी उबदार वातावरण असते अशा ठिकाणी जाण्यासाठी प्लॅनिंग करत असतात.
याच पद्धतीने तुम्हाला देखील जर या हिवाळ्याच्या गुलाबी थंडीमध्ये एखाद्या उबदार असलेल्या ठिकाणी फिरायला जायचा प्लान बनवायचा असेल व वातावरणाच्या या थंड आणि थोडेसे उबदार अशा वातावरणाचे कॉम्बिनेशन अनुभवायचे असेल तर तुम्ही लेखात माहिती दिलेल्या कुठल्याही एका ठिकाणाला भेट देऊन तुमची सहल अविस्मरणीय बनवू शकतात.
डिसेंबर महिन्यामध्ये फिरण्यासाठी हे ठिकाण ठरतील फायद्याचे
1- जैसलमेर- जैसलमेर हे डेस्टिनेशन किंवा पर्यटन स्थळ राजस्थान राज्यांमध्ये असून पर्यटकांमध्ये खास प्रसिद्ध आणि आकर्षण असलेले ठिकाण आहे. त्यामुळे तुम्हाला जर डिसेंबरच्या गुलाबी थंडीमध्ये फिरायला जायचे असेल तर तुम्ही जैसलमेर हा पर्याय निवडू शकतात.
या ठिकाणाचे जर डिसेंबरमधील तापमान बघितले तर साधारणपणे ते 20° c ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. त्यामुळे तुम्ही गुलाबी थंडीत उबदारपणाचा अनुभव या ठिकाणी जाऊन घेऊ शकतात.
याशिवाय जैसलमेरला गेल्यावर तुम्हाला तनोट माता मंदिर तसेच पाटो की हवेली आणि जैसलमेर किल्ल्याला भेट देता येते व या ठिकाणी असलेला गदिसर तलाव देखील खूप आकर्षणाचे केंद्र आहे.
2- गोकर्ण- गोकर्ण हे ठिकाण देखील हिवाळ्यामध्ये फिरण्यासाठी खूप बेस्ट असा ऑप्शन असून या ठिकाणी दरवर्षी देश आणि विदेशातील अनेक पर्यटक भेट देत असतात. हे कर्नाटक राज्यामध्ये असून या ठिकाणी डिसेंबरमध्ये तापमान 22 ते 34 अंश सेल्सिअस असते.
त्यामुळे हिवाळ्यात उबदारपणाचा अनुभव या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने घेता येतो. तसेच गोकर्णला गेल्यावर तुम्ही त्या ठिकाणी असलेले भव्य आणि सुंदर असे समुद्रकिनारे पाहू शकतात. विशेष म्हणजे गोकर्ण हे हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते व या ठिकाणी भगवान शंकराचे मंदिर देखील खूप प्रसिद्ध आहे.
3- गोवा- हिवाळ्यामध्ये जर तुम्हाला अजून कुठे फिरायला जायचं प्लान असेल तर गोवा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. हिवाळ्यामध्ये या ठिकाणाचे तापमान 21 ते 32° सेल्सिअस पर्यंत असते या ठिकाणी तुम्हाला थंडी जाणवत नाही.
गोव्याला दरवर्षी कुठल्याही हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात व खास करून हिवाळ्यात जास्त प्रमाणात पर्यटकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. आपल्याला माहित आहे की गोव्याला सुंदर आणि आकर्षक असे समुद्रकिनारे असून या ठिकाणी तुम्ही कुटुंबासोबत सुंदर अशी ट्रीप एन्जॉय करू शकतात.