ईद हो, होली हो, दिवाली हो या रक्षा बंधन…सारे तेहवार मोहब्बत के लिए होते है.. डॉ.कमर सुरुर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- देशाच्या भवितव्या संबधी असणारे शुभचिंतक आणि विवेकाशील लोकांना प्रखरतेने याची जाणीव झाली आहे की आमचा प्रिया भारत देश यावेळी अनेक समस्यांने होरपळुन निघत आहे. त्याला काळजी वाटते की वेळीच या विद्वेषी प्रवृतीला प्रतिबंध घातला नाही तर परिस्थिती फारच चिंतनीय होऊ शकते.

वास्तविकता आहे की आमचा देश अनेक समस्यांने ग्रासला आहे. गरीबी, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार या सारख्या समस्येने सर्वसामान्य जनतेस वेठीस धरले आहे आणि हे ही तितकेच खरे आहे की या समास्या व्यतिरिक्त शांती आणि मानवतेला कलंकीत करणार्‍या घटना एक प्रमुख संकट आहे. यापासून देशाला देश वासियांना वाचविण्यासाठी मखदुम सोसायटीच्यावतीने कौमी एकता सप्ताह हा उपक्रम कौतुकास्पद असाचा आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ.कमर सुरुर यांनी केले.

मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त कौमी एकता सप्ताहांतर्गत रहेमत सुल्तान हॉल येथे सदभावनेसाठी महेफिले मुशायरयाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी डॉ.कमर सुरुर बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य उर्दू संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरफुद्दीन शेख, शरीफ खान, प्रा. मेहेबुब सय्यद, मकबुल सर, अ‍ॅड.अमिन धाराणी, शौकत विराणी, कलीमुद्दीन भाई आदि उपस्थित होते.

मुशायर्‍याच्या सुरवातीला अर्क अहेमदनगरी यांनी आपली रचना सादर करतांना म्हणाले की, ‘नफरत का यारो दामन छोडो.. दिल से दिल का रिश्ता जोडो…’ या कविताने चांगली सुरुवात झाली. यानंतर मुन्नवर हुसेन यांनी ‘अमन के दिप जलाना बहोत ज़रुरी है….ये भेदभाव मिटाना बहोत ज़रुरी है… या संदेश पूर्वक रचनेने मुशायरया मध्ये भरपुर रंग भरले…या नंतर नफिसा हया यांनी आपल्या कविताचे सादरीकरण करतांना म्हणाले की ‘युसूफ का कौन है वो खरीददार देखकर… मै आ रही हूं मिस्त्र का बाजार देखकर’ या नाजुक शैलीच्या कवितेने रसिकांची भरभरुन दाद मिळविली…

याच वातावरणाला पुढे नेत आसिफ सर म्हणाले की ‘ या खुदा अब मुनसीफीभी खो गयी… झुठ तो सच के बराबर आ गया….या कवितेनी संर्पूण हॉल वाह वाह..ने गुंजत होता. या परिस्थितीत या मुशायर्‍याला याच वातावरनात पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी एक अनुभवी मन्सूर शाकिर यांनी पार पाडतांना सांगितले की ‘ देखता इन्सान के चेहरे बदलने का वो फन… फितरते इन्सान है कैसे सोचता है आयना…या दर्जेदार कवितेने रसिकांचा उत्साह बांधुन ठेेवला याला पुढं नेतांना बिलाल अहेमदनगरी यांनी मांडले की ‘बुढापे में हमारे कदम डगमगाये…

कोई ये समझा के हम पीकर आये…’ या सत्यावर आधारित कवितेने लोकांची वाहऽ वाह मिळविली. या नंतर डॉ.कमर सुरुर यांनी आपल्या रचना सादर करतांना म्हणाले की…. ईद हो, होली हो, दिवाली हो या रक्षा बंधन…सारे तेहवार मोहब्बत के लिए होते है…एक कमजोर से धागे ने बताया है कमर…..भाई बहनों की हिफाज़त के लिए होते है… या राष्ट्रीय एकात्मता व भाऊ-बहिनीच्या नात्यावरच्या कवितेने रसिक एकदम मंत्र मुग्ध झाले. या नंतर सलिम यावर यांनी ‘ऐ आइने तफसीर मेरी उमर की लिख दे… एक तुही तो बचपनसे मुझे देख रहा है…’ या लोकांना अंतर्मुख केले.

शेवटी मुशायर्‍याचे अध्यक्ष शरीफ खान यांनी ‘चंदनसे साप लिपटा रहा मुद्दतो मगर.. ना पायी वैसी खुशबु कभी अपने बदनसे…’ या कवितीने कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सलीम यावर यांनी केले तर प्रस्तावीक आबीद दुलेखान यांनी केले. आभार शफकत सय्यद यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नादीर खान, आरिफ सय्यद, अबरार शेख, तारिक शेख, शहानवाज तांबोळी व मखदुम सोसायटीच्या सर्व सदस्यांनी भरपूर परिश्रम घेतले. या सदभावना मुशायरायाला अहमदनगरच्या रसिकांनीही भरभरुन प्रतिसाद दिला. मुशायर्‍यात शासनाचे सर्व नियम पाळण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment