Best Summer Destinations : या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्हीही फिरायला जायचा प्लॅन केला असेल तर तुमच्यासाठी भारतातील काही पर्यटन स्थळे खास ठरू शकतात. त्यासाठी तुम्हाला भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळे माहिती असणे आवश्यक आहे.
भारतात अशी काही पर्यटन स्थळे आहेत ज्याठिकाणी विदेशी पर्यटकांसह भारतातील लाखो पर्यटक भेट देत असतात. उन्हाळ्यात अनेक राज्यामधील तापमान वाढते. त्यामुळे अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणे पसंत करत असतात.
अनेकजण समुद्राला लागून असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देणे पसंत करत असतात. तसेच काहीजण नैसर्गिक नयनरम्य वातावरण असलेल्या ठिकाणी भेट देण्यास पसंत करत असतात. अशा ठिकाणी उष्णता कमी असते त्यामुळे तुम्ही आरामदायी काही क्षण या ठिकाणी घालवू शकता.
या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्हीही फिरायला जाणार असाल तर पश्चिम भारतातील ४ प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या. या ठिकाणी जर तुम्ही भेट दिली नक्कीच तुमची सहल अविस्मरणीय होईल.
कासा जाली, पाटनेम बीच
तुम्ही या उन्हाळ्यात समुद्र किनारी भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी गोव्याला भेट देणे उत्तम देणे उत्तम ठरू शकते. पाटनेम या बीचला भेट देऊन तुम्ही सुट्टीचा आनंद घेऊ शकता. या बीचवर दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. खाद्यपदार्थांसाठी आणि येथील हवामानसाठी हा बीच फेमस आहे.
धारणा, शिल्लीम
धरणा हे एक मुंबई किंवा पुण्यापासून फक्त 2 तासांच्या अंतरावर असलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. ज्या ठिकाणी तुम्ही उन्हाळ्याची सुट्टी घालवू शकता. वेलनेस प्रोग्राम, ऑरगॅनिक फार्म आणि कुकिंग स्कूलचा तुम्ही या ठिकाणी आनंद घेऊ शकता.
पामलँड्स हॉलिडे होम, गोराई, मुंबई
जर तुम्हाला व्यस्त जीवन आणि प्रदूषणाने भरलेल्या हवेतून विश्रांती हवी असेल, तर तुम्ही मुंबईतील गोराई येथे असलेल्या पामलँड्स हॉलिडे होम या ठिकाणी भेट देऊ शकता. प्रौढ आणि लहान मुलांसाठी पूलसह वाढदिवस पार्टी, वर्धापन दिन आणि विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची सुविधा या ठिकाणी केली जाते. तुमचा कौटुंबिक सहलीचा किंवा पिकनिकचा प्लॅन तुम्ही या ठिकाणी करू शकता.
कॉनराड पुणे
कॉनराड हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि फेमस 5 तारांकित हॉटेल आहे. तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये या ठिकाणी काही क्षण घालवू शकता. येथे तुम्ही आयपीएलच्या विशेष स्क्रिनिंगपासून ते ताजेतवाने पेये आणि चविष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकाल.