Best Summer Destinations : सध्या एप्रिल महिना सुरु आहे. या महिन्यामध्येच उन्हाचा पारा खूपच वाढला आहे. पण अनेकजण उन्हाळ्यामध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. कारण उन्हाळ्यामध्ये शाळेला सुट्टी असते. तसेच कर्मचारी देखील सुट्टी घेऊन आपल्या कुटुंबासोबत फिरायला जात असतात.
जर तुम्हीही कौटुंबिक सहलीचे आयोजन करत असताल तर तुम्ही भारतातील काही सुंदर ठिकाणांना भेट देऊन सहलीचा आनंद घेऊ शकता. उष्णता वाढल्याने अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी जनयास इच्छुक असतात.
ही ठिकाणे उन्हाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहेत
लडाख
जर तुम्हालाही बाईक रायडिंगचा आनंद घेईचा असेल तर तुम्ही लडाखला भेट देऊ शकता. तसेच या ठिकाणी तुम्ही उन्हाळ्यामध्ये थंड हवेचा देखील आनंद घुले शकता. येथील सुंदर पर्वत पाहून तुम्हालाही अगदी तणावमुक वाटेल. या ठिकाणी तुम्ही उन्हाळ्यात देखील बर्फाने झाकलेले पर्वत पाहू शकता.
मुन्नार
केरळमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी मुन्नार हे एक आहे. मुन्नारला प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. या ठिकाणे तुम्हाला अनेक मनमोहक सुंदर ठिकाणे पाहायला मिळतील.
राणीखेत
राणीखेत हे उत्तराखंड मधील एक सुंदर आणि मनमोहक हिल स्टेशन आहे. या ठिकाणी शांत वातावरण अनुभवण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात. या ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. तसेच नैसर्गिक नयनरम्य वातावरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील.
उटी
उन्हाळ्यात भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांमध्ये उटीची गणना होते. जिथे गावाची संस्कृती पाहायला मिळते. हे ठिकाण पर्यटकांसाठी मुख्य केंद्र आहे, येथील हवामान तुम्हाला वेड लावेल, जे नैसर्गिक सौंदर्य वाढवण्याचे काम करते. येथे भेट देण्यासारखी अनेक प्रसिद्ध ठिकाणेही आहेत.
औली
औली या ठिकाणी तुम्ही सुंदर पर्वतदृश्य पाहू शकता. दाट ढगांमध्ये तुम्हाला या ठिकाणी पर्वत रंग पाहायला मिळतील. उन्हाळ्यात देखील या ठिकाणच्या पर्वतावर तुम्हाला बर्फ पाहायला मिळेल. हे उत्तराखंडमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.