Best Summer Destinations : उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी अनेकजण सहलीचे नियोजन करत असतात. भारतामधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. तुम्ही भारतातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळांना यावर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत भेट देऊ शकता.
देशातील अनेक भागात उष्णता प्रचंड प्रमाणात वाढत असते. त्यामुळे अनेकजण थंडगार हेवेच्या ठिकाणी भेट देऊ शकता. भारतामध्ये काही प्रसिद्ध हिल स्टेशन आहेत ज्याठिकाणी तुम्ही भेट देऊन सहलीचा आनंद घेऊ शकता.
अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात मात्र त्यांना भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध पर्यटन स्थळांविषयी माहिती नसते. त्यामुळे सर्वात प्रथम पर्यटन स्थळांविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठी देशातील अनेक पर्यटन स्थळे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. त्याठिकाणी तुम्ही देखील भेट देऊन सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.
उभा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्हीही फिरायला जाणायचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी भारतातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळी भेट देऊन तुम्हीही नैसर्गिक पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.
काश्मीर
तुम्हीही कडक उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी फिरायला जाणार असाल तर तुमच्यासाठी काश्मीर हे सर्वोत्तम पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी मुघल गार्डन, ट्युलिप गार्डन यासारख्या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. तसेच इतर पर्यटन स्थळांना देखील तुम्ही भेट देऊ शकता.
सिक्कीम
सिक्कीममध्ये तुम्ही हिरव्या दऱ्या आणि तलावाच्या सौंदर्याची मनमोहक दृश्य पाहू शकता. तसेच तुम्ही याठिकाणी ट्रेकिंग करू शकता. हे ठिकाण कौटुंबिक सहलीसाठी खूप चांगले आहे. येथील सुंदर दऱ्या तुमचे मन मोहून टाकतील.
लडाख
तुम्हाला बाईक रायडींगचा आनंद घेईचा असेल तर तुम्ही लडाख या पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्ही डोंगर दऱ्यामधून बाईक चालवून आनंद घेऊ शकता. दऱ्या, तलाव, पर्वत आणि बौद्ध मठांचे सौंदर्य तुम्ही याठिकाणी पाहू शकता.
कुर्ग
कर्नाटकात अनेक हिल स्टेशन आहेत. तसेच प्रसिद्ध कुर्ग हिल स्टेशनला तुम्ही भेट देऊ शकता. कुर्गचे हिरवेगार दृश्य आणि थंड हवामान तुमची ट्रिप अविस्मरणीय करेल. तुम्ही येथे ट्रेकिंग आणि पक्षी निरीक्षणाचा आनंद घेऊ शकता.