Best Summer Destinations : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकांना फिरायला जायचे असते. मात्र बजेट कमी असल्याने अनेकांना आवडत्या ठिकाणी फिरायला जाता येत नाही. त्यामुळे अनेकजण जवळच्या पर्यटन स्थळांना भेट देत असतात. पण आता तुम्ही देखील सुंदर आणि प्रसिद्ध हिल स्टेशनला कमी बजेटमध्ये भेट देऊ शकता.
अनेकांना उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या असतात. त्यामुळे सहलीचे नियोजन करत असतात. काही जण मित्रांसोबत तर काहीजण कुटुंबासोबत फिरायला जात असतात. या उन्हाळ्यात तुम्ही देखील भारतातील प्रसिद्ध हिल स्टेशनला भेट देऊन सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.
चितकुल (हिमाचल प्रदेश) –
तुम्हालाही उन्हाळ्यात हिल स्टेशनला भेट देईची असेल तर हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील चितकुल या सुंदर पर्यटन स्थळी भेट देऊन सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता. बास्पा नदीच्या काठावर वसलेले चितकुल हे भारतातील शेवटचे गाव आहे.
या ठिकाणी तुम्हाला सहलीला जाण्यासाठी सुमारे 15,000 रुपये प्रति व्यक्ती खर्च येईल. चितकुलला जाण्यासाठी कार, बस, ट्रेन किंवा फ्लाइटचा वापर करू शकता. या ठिकाणी भेट देण्यासाठी तुम्हाला जून हा सर्वोत्तम महिना आहे.
मॅक्लॉडगंज (हिमाचल प्रदेश)-
हिमाचलमधील कांगडा जिल्ह्यातील मॅक्लॉडगंज हे एक छोटेसे सुंदर पर्यटन ठिकाण आहे. हे पर्यटन ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 6,381 फूट उंचीवर आहे. मॅक्लॉडगंज हे त्याच्या आकर्षक मठासाठी आणि सुंदर दृश्यांसाठी पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
जर तुम्हाला या ठिकाणी जायचे असेल तर प्रति व्यक्ती 10,000 रुपये खर्च येईल. मॅक्लॉडगंजला जाण्यासाठी तुम्हाला कार, बस, ट्रेन किंवा फ्लाइटचा वापर करू शकता.
अल्मोरा (उत्तराखंड) –
अल्मोरा हे एक भारतातील सुंदर आणि थंड हिल स्टेशन आहे. हे ठिकाण उत्तराखंडच्या कुमाऊँ पर्वतावर आहे. या गावाची लोकसंख्या 35,000 च्या आसपास आहे. ब्राइट एंड कॉर्नर, गोविंद बल्लभ संग्रहालय, चिताई गोलू देवता मंदिर, कालीमठ अल्मोडा आणि कासार देवी मंदिर या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.
या ठिकाणी जाण्यासाठी प्रति व्यक्ती तुम्हाला 10,000 रुपये खर्च येईल. तुम्ही कार, बस, ट्रेन किंवा फ्लाइटने अल्मोरासाठी प्रवास करू शकता. जर तुमचा या ठिकाणी भेट देण्याचा प्लॅन असला तर एप्रिल ते जुलै महिना सर्वोत्तम आहे.
माउंट अबू (राजस्थान) –
माउंट अबू हे राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. माउंट अबू हिरवीगार शेते, धबधबे, तलाव आणि नद्या यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्ही एप्रिल ते जून महिन्यामध्ये भेट देऊ शकता.
या ठिकाणी तुम्हाला सहलीला जाण्यासाठी प्रति व्यक्ती 7,000 रुपये खर्च येईल. तुम्ही कार, बस, ट्रेन किंवा फ्लाइटने माउंट अबूला जाऊ शकता. दिलवारा जैन मंदिर, सनसेट पॉइंट, अचलेश्वर महादेव मंदिर, माउंट अबू बाजार आणि वन्य अभयारण्य या ठिकाणी भेट देऊ शकता.