अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- देशभरात वाढलेली ऑनलाइन फ्रॉड ची प्रकरणं लक्षात घेता सरकारने बनावट वेबसाइटची यादी जाहीर केली आहे. जर तुम्ही देखील या वेबसाइटचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर तुमच्या खात्यातील रक्कम आणि तुमची वैयक्तिक माहिती चोरी होण्याची दाट शक्यता आहे.
पीआयबीने सहा वेबसाइटची यादी जारी केली आहे. या वेबसाइटपासून युजर्सनी दूर राहणेच त्यांच्या हिताचे आहे. तुम्ही या वेबसाइटवर व्हिजीट केल्यास मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल. तुमच्या आयुष्यभराची कमाई देखील गायब होऊ शकते.यामध्ये फ्री स्कॉलरशीप किंवा फ्री लॅपटॉमचे आमिष दाखवणाऱ्या वेबसाइट्सचाही समावेश आहे.
ही आहे या वेबसाइट्सची यादी-
>> http://centralexcisegov.in/aboutus.php
>> https://register-for-your-free-scholarship.blogspot.com/
>> https://kusmyojna.in/landing/
>> https://www.sajks.com/about-us.php
> https://register-form-free-tablet.blogspot.com/
भ्रामक किंवा फसवणूक करणाऱ्या बातम्यांबाबत पीआयबीकडून सामान्य जनतेला जागरुक केलं जातं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजबाबतही फॅक्ट चेक करण्याचं काम PIB कडून करण्यात येतं. कोरोना काळात सर्वाधिक प्रमाणात चुकीच्या बातम्या, बनावट मेसेज व्हायरल करण्यात आले आहेत.
याबाबत सामान्यांना माहिती असेलच असं नाही, अशावेळी सरकारची प्रेस इन्फरमेशन ब्युरो वेळोवेळी बनावट आणि भ्रामक बातम्यांबाबत अलर्ट करण्याचे काम करत असते. सरकारकडून पीआयबीच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये