Big Breaking : मंदिराच्या आवारातच दोन साधूंची धारदार शस्त्राने हत्या !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 :- महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधूंच्या मॉब लिंचिंगची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशमध्ये दोन साधूंची हत्या घडली आहे.

बुलंदशहरमधील अनुपशहर कोतवालीच्या पागोना गावात मंदिर परिसरात झोपलेल्या दोन साधूंवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. जमावाने आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साधू जगन दास (55 वर्षे) आणि सेवादास (35 वर्षे) हे बुलंदशहरमधील अनुपशहर कोतवालीच्या पागोना गावात असलेल्या शिव मंदिरात राहत होते.

दोन्ही साधू मंदिरात वास्तव्य करीत होते. सोमवारी रात्री मंदिराच्या आवारात दोन्ही साधूंची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी गावकरी मंदिरात पोहोचले तेव्हा त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले हे साधू दिसले.

ही बातमी पसरताच मोठ्या संख्येने गावकरी मंदिरात पोहोचले. घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर सीओ अनूपशहर अतुल चौबे, कोतवाल मिथिलेश उपाध्याय पोलिस दलासह घटनास्थळी दाखल झाले. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe