Jio Free Recharge Plan : टेलिकॉम कंपनी जिओकडून अनेकदा ग्राहकांना रिचार्ज प्लॅनमध्ये मोठी सूट दिली जाते. तसेच कंपनीकडून सुरुवातील सर्व ग्राहकांना मोफत सेवा दिली होती. जिओ कंपनीकडून वेळोवेळी अनेक रिचार्ज प्लॅनवर ऑफर्स दिल्या जात असल्याने अनेकजण जिओ टेलिकॉम कंपनीकडे आकर्षित होत आहेत.
जेव्हा मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीकडून जिओ टेलिकॉम कंपनीची निर्मिती करण्यात आली तेव्हा ग्राहकांना सुरुवातीचे २ वर्षे मोफत सेवा देण्यात आली होती. त्यामुळे सुरुवातीलाच जिओचे लाखो ग्राहक बनले.
आता ग्राहकांना कंपनीकडून होळीच्या मुहूर्तावर मोफत रिचार्जची ऑफर दिली जात आहे. कंपनीकडून अनेकदा ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर्स आणल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्याचा फायदा होत आहे.
आता तुम्हालाही तुमच्या जिओ सिमला रिचार्ज करायचा असेल तर जरा थांबा. कारण जिओकडून १ महिन्याचा मोफत रिचार्ज दिला जात आहे. तुम्हीही मोफत रिचार्जचा फायदा घेऊ शकता.
Jio चा 1 महिन्याचा रिचार्ज पूर्णपणे मोफत कसा मिळवायचा?
जिओकडून होळी ऑफर लागू करण्यात आली आहे. जर तुम्ही जिओ ग्राहक असाल तर कंपनीने तुमच्यासाठी 2999 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला पहिले 365 दिवस अमर्यादित कॉल्स मिळतील. 2.50GB डेटा आणि यासोबत 100SMS ची सुविधा दररोज उपलब्ध होईल.
जिओ कंपनीकडून आता या रिचार्ज प्लॅनमध्ये काही बदल केला आहे. आता तुम्ही १ महिन्याचा रिचार्ज मोफत मिळवू शकता. जिओ कंपनीच्या 2999 रुपयांच्या प्लॅनची मुदत 365 दिवसांवरून 388 दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.50GB डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि 100SMS प्रतिदिन देण्यात येत आहे. कंपनीकडून या रिचार्ज प्लॅनची मुदत 23 दिवस वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे.
जर तुम्हालाही या मोफत १ महिन्याचा रिचार्ज हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला 2999 रुपयांचा रिचार्ज करावा लागले. या प्लॅनमध्ये तुम्हाला जवळपास २३ दिवस मोफत मिळत आहेत. त्यामुळे तुमचे १ महिन्याचे पैसे वाचत आहेत.