साेन्या-चांदीच्या मागणीत मोठी वाढ !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- कोरोना महारोगराईमुळे कठीण काळातून जाणाऱ्या सराफा बाजारपेठेसाठी धनत्रयोदशी-दिवाळीच्या सणामुळे दिलासा मिळाला आहे.

लॉकडाऊनच्या नियमांतील शिथिलता पाहता घरांतून बाहेर निघून धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी करत आहेत. यामुळे सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ पाहायला मिळाली आहे.

विशेष म्हणजे, कोरोना महारोगराईदरम्यान या वर्षी सात ऑगस्टला हाजिर बाजारात सोने ५६,१२६ रु. प्रति १० ग्रॅम आणि चांदी ७५,०१३ प्रतिकिलोच्या विक्रमी उंचीपर्यंत पोहोचले होते.

मात्र, केवळ तीन महिन्यांनंतर सोने विक्रमी उंचीच्या जवळ पोहोचले होते. मात्र, तीन महिन्यांनंतर सोने विक्रमी उंचीच्या जवळ ६,००० रु.

व चांदी १२,००० रु. कमी किमतीवर मिळत आहे. या वर्षी किमतींतील २९ टक्के तेजीमुळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने सोने-चांदी खरेदी करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment