मोठी बातमी : जिओने व्होडा-आयडिया आणि एअरटेलवर केला ‘हा’ धक्कादायक आरोप; तक्रार दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- मुकेश अंबानी यांची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ ने व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेलविरूद्ध भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) कडे तक्रार दाखल केली आहे.

या दूरसंचार कंपन्या शेतकरी चळवळीचा फायदा घेत असून जिओ विरोधात नकारात्मक मोहीम राबवित असल्याचा आरोप केला आहे.

जीओने व्हीआय आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांवर शेतकरी चळवळीस कॅम्पेन म्हणून वापरल्याचा आरोप करून त्यांनी जीओची बदनामी केली असल्याचे म्हटले आहे.

जिओने असे म्हटले आहे कि, उत्तर भारतातील बर्‍याच भागातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्हीआय आणि एअरटेल जियोविरूद्ध नकारात्मक कॅम्पेन राबवित आहेत.

रिलायन्स जिओने त्यांच्याविरुद्ध खोटा प्रचार केल्याचा :- आरोप केला त्यांच्या तक्रारीत जिओ म्हणाले की, शेतकरी चळवळीने निर्माण झालेल्या रोषाचा फायदा घेण्यासाठी दोन्ही कंपन्या खोट्या प्रचाराचा अवलंब करीत आहेत. या कंपन्या ग्राहकांमध्ये जिओची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 सोशल मीडियावर जिओविरूद्ध कॅम्पेन :- ट्राय यांना लिहिलेल्या पत्रात जिओने म्हटले आहे की- व्हीआय आणि एअरटेल ग्राहकांना आमिष दाखवून रिलायन्स जिओमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) मोहिमेसाठी बर्‍याच सोशल प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. जिओ ग्राहकांना एअरटेल आणि व्हीआय वर पोर्ट करण्यास सांगितले जात आहे. पुरावा म्हणून जिओने ट्रायकडे फोटो आणि व्हिडिओही सादर केले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment