अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयवर दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. कमिशनच्या रूपाने कर्मचार्यांना पुरस्कृत करण्याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांसह अन्य नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड आकारण्यात आला आहे.
केंद्रीय बँकेच्या प्रसिद्धीपत्रानुसार बँक नियमन कायद्यातील काही तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे आणि कमिशनच्या रूपाने बँक कर्मचार्यांना मोबदला देण्याबाबत सुचविलेल्या सूचनांसाठी दंड आकारण्यात आला आहे. आरबीआयने सांगितले की ही कारवाई नियामक अनुपालन न केल्याने केल्याने केली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या आर्थिक कंडिशनच्या संदर्भात 31 मार्च 2017 आणि 31 मार्च 2018 रोजी वैधानिक निरीक्षणतर्गत आली होती. हे जोखीम मूल्यांकन अहवालाशी (आरएआर) संबंधित होते. हा दंड का आकारला जाऊ नये, अशी विचारणाही आरबीआयने स्टेट बँकेला केली होती.
तसेच आरबीआयने आपल्या कर्मचार्यांना भरपाई देण्याचेही स्टेट बँकेला सांगितले होते. रिझर्व्ह बँकेच्या नोटिसला स्टेट बँकेचा प्रतिसाद, वैयक्तिक सुनावणी दरम्यान तोंडी प्रतिसाद आणि एसबीआयने सादर केलेली कागदपत्रे तपासल्यानंतर रिझर्व्ह बँकेने असा निष्कर्ष काढला की एसबीआयने नियमांचे उल्लंघन केले आहे.
यानंतर हा दंड लागू करण्याचा निर्णय केंद्रीय बँकेने घेतला. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 चे कलम 10 (1) (b) (ii) चे उल्लंघन आणि कर्मचार्यांना कमिशन म्हणून मोबदला देण्याच्या संदर्भात असणाऱ्या गाईडलाईन न पाळल्याने रिझर्व्ह बँकेने एसबीआयवर दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|