भाजप आमदारांमुळेच येडियुरप्पांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :  कर्नाटकमधील काही भाजप आमदार मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असून त्यातील काही आमदारांची गुरुवारी बैठक पार पडली.

त्यानंतर राज्यात पर्यायी नेतृत्व उभे करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे येडियुरप्पांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत तरी हायकमांड मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या बाजूने आहे.

येडियुरप्पा यांना अन्य कुठला पर्याय असू शकत नाही असे हायकमांडचे मत आहे. पण जे आमदार भेटले व फोनवरुन चर्चा केली, त्यांच्यामध्ये बासनगौडा पाटील आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.

आमदारांकडून समोर आलेले नाव बासनगौडा पाटील हे सुद्धा लिंगायत समाजाशी संबंधित आहेत. एक वेळ विधानपरिषदेवर आणि तीन वेळ आमदार राहिलेले बासनगौडा पाटील यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद भूषवले आहे.

उत्तर कर्नाटकातील वजनदार नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जवळपास ४० आमदार बासनगौडा पाटील आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे नाव हाय़कमांडला सुचवायला तयार आहेत.

मागच्या काही दिवसात २५ आमदार वेगवेगळया ठिकाणी भेटले व ६० आमदार फोनवरुन परस्परांच्या संपर्कात होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment