मनोज तिवारींना भाजपा प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविले; ‘यांची’ लागली वर्णी

Published on -

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मनोज तिवारी यांना दिल्ली प्रदेश अध्यक्ष पदावरून काढून टाकले आहे. त्यांच्याऐवजी आता आदर्श कुमार गुप्ता हे दिल्ली भाजपचे अध्यक्ष असतील.

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ही नेमणूक केली आहे. मनोज तिवारी बाहेरचे असल्यामुळे त्यांना स्थानिक नेत्यांचा विरोध होता.

काही दिवसांपूर्वी जेवणाच्या मुद्द्यावरून तिवारी वादग्रस्त बनले होते. आदेश गुप्ता यांचे व्यापा-यांमध्ये चांगले संबंध आहेत. भाजप मूळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदेश गुप्ता यांचे नाव घोषित करण्यात आलं.

गुप्ता एमसीडीमध्ये महापौर राहीले आहेत. या नेमणुकीनंतर मनोज तिवारी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सर्वांचे आभार मानले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe