दिल्लीत हाय सिक्युरिटी असलेल्या भागात ‘बॉम्बस्फोट’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-नवी दिल्लीतल्या ल्युटन्स झोनसारख्या प्रतिष्ठित आणि हाय सिक्युरिटी असलेल्या अब्दुल कलाम मार्गावर स्फोट झाल्याची घटना घडली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या स्फोटात परिसरातील चार ते पाच गाड्यांचं नुकसान झालं आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इस्रायल दूतावासाजवळ हा स्फोट झाला.

हा भाग दिल्लीतला सगळ्यात हाय प्रोफाइल भागाजवळ आहे. स्फोट झाला ते ठिकाण विजय चौकापासून फक्त दीड किलोमीटरवर आहे.

याच विजय चौकात बीटिंग रीट्रीट कार्यक्रम सुरू होता. फक्त या कार्यक्रमामुळे स्फोटाच्या हानीचं प्रमाण कमी झालं. दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारीनंतर राष्ट्रपती भवनाजवळ हा बीटिंग रीट्रिटचा कार्यक्रम होते.

त्यासाठी विजय चौकापासूनच मोठा फौजफाटा आणि बंदोबस्त असतो. तसंच या परिसरातले रस्ते सामान्य वाहतुकीसाठी बंद केले जातात. याच कारणामुळे तुघलक रोड आणि ल्युटन्स दिल्ली परिसरात रोजच्यासारखी वर्दळ नव्हती.

त्यामुळे या स्फोटात 4-5 गाड्यांचं नुकसान झालं. जीवितहानी टळली. हा स्फोट कमी तीव्रतेचा असला तरी सध्या दिल्लीतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्त्व प्राप्त झालं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe