Holi Sale : बंपर ऑफर! होळीपूर्वी आयफोन १३ झाला इतक्या हजारांनी स्वस्त, पहा ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:

Holi Sale : भारतात आयफोनची किंमत खूप आहे. पण दिवसेंदिवस तरुणांमध्ये आयफोनची क्रेझ वाढत चालली आहे. अनेकांचे आयफोन घेण्याचे स्वप्न असते. पण त्याची किंमत जास्त असल्याने अनेकांना खरेदी करणे परवडत नाही. मात्र आता होळीमुळे अनेक ठिकाणी आयफोनवर ऑफर्स लागल्या आहेत.

जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुमचे आयफोन घेण्याचे स्वप्न असेल तर ते पूर्ण होऊ शकते. कारण फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाईटवर आयफोन कमी किमतीमध्ये मिळत आहे. कारण या ठिकाणी होळीमुळे ऑफर लागली आहे.

फ्लिपकार्टवर तुम्ही कमी किमतीमध्ये आयफोन खरेदी करू शकता. त्यामुळे तुमच्या पैशांची बचत तर होईलच पण आयफोन घेण्याचे स्वप्न देखील पूर्ण होईल. फ्लिपकार्टवर लागलेल्या आयफोन सेलचा फायदा घेऊन पैसे वाचवू शकता.

Apple iPhone 13 फ्लिपकार्ट सेल

बाजारात iPhone 13 128GB स्टोरेज वेरिएंटची मूळ किंमत 69,900 रुपये आहे. पण फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाईटवर तुम्हाला ११ टक्के सूट दिली जात आहे. हा फोन तुम्हाला फ्लिपकार्टवर सूट मिळाल्यानंतर 61,999 रुपयांना मिळेल.

फ्लिपकार्टच्या सूटमुळे तुम्हाला iPhone 13 वर 7,901 रुपयांची सूट मिळत आहे. तसेच आयफोन १३ वर आणखी काही ऑफर्स दिल्या जात आहेत. त्यामुळे हा फोन तुम्हाला आणखी स्वस्त किमतीमध्ये मिळेल.

आयफोन 13 एक्सचेंज ऑफर

जर तुमच्याकडे जुना फोन असेल तर तुम्ही तो एक्सचेंज करून तुम्ही आणखी सूट मिळवू शकता. फ्लिपकार्ट सूट व्यतिरिक्त तुम्हाला 23,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. एक्सचेंज ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे असणारा फोन सुव्यवस्थित असायला हवा.

जर तुम्हाला iPhone 13 साठी 23,000 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट मिळाला तर त्याची किंमत 61,999 रुपयांऐवजी केवळ 38,999 रुपये असू शकते. अधिक सूट मिळविण्यासाठी तुम्ही बँक ऑफरसाठी देखील अर्ज करू शकता.

Apple iPhone 13 बँक ऑफर

फ्लिपकार्ट सूट आणि एक्सचेंज ऑफर व्यतिरिक्त तुम्हाला बँक ऑफर देखील दिली जात आहे. जर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला 2,000 रुपयांची आणखी सूट दिली जाईल.

तसेच तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला ५ टक्के म्हणजेच ३१०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही आयफोन १३ फक्त 35,000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe