देशाला हादरवणारी बातमी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी, गौतम अदानी सह मुख्यमंत्र्याविरुद्ध अमेरिकेत खटला, समन्स जारी

Ahmednagarlive24 office
Published:

National News :- उद्योगपती गौतम अदानी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याविरोधात अमेरिकेच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी तिघांनाही अमेरिकन कोर्टाने समन्स बजावले आहेत. विशेष बाब म्हणजे रिचमंडचे डॉक्टर लोकेश वायुरू यांनी पेगासस, भ्रष्टाचारासह अनेक मुद्द्यांवर हा खटला दाखल केला आहे.त्याचवेळी, या नेत्यांसह अनेकांना न्यायालयाकडून समन्स जारी केले आहेत.

रिचमंडचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट लोकेश व्युरु यांनी पीएम मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.याशिवाय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष प्रोफेसर क्लॉस श्वाब यांचेही नाव या खटल्यात समाविष्ट आहे.

विशेष म्हणजे कोणत्याही कागदोपत्री पुराव्याशिवाय आंध्र प्रदेशातून आलेल्या एका भारतीय-अमेरिकन डॉक्टरने खटला दाखल करण्यात आला आहे.24 मे रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने 22 जुलै रोजी समन्स जारी केले होते. भारतात हे समन्स 4 ऑगस्टला पाठवण्यात आले.

पीएम मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्यासह अनेक लोक भ्रष्टाचार आणि राजकीय विरोधकांविरुद्ध पेगासस स्पायवेअर वापरण्यात गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम पाठवण्याबाबतही त्यांनी बोलले आहे. 24 मे रोजी खटला दाखल करण्यात आला होता.

(ही बातमी आताच ब्रेक झाली असल्याने इतकीच माहिती तूर्तास उपलब्ध आहे अधिक माहिती थोड्याच वेळेत अपडेट केली जाईल)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe