सेलिब्रेटींच्या ट्विटचा केला जाणार तपास; गृहमंत्र्यांचे निर्देश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-शेतकरी आंदोलनावरून लता मंगेशकर, विराट कोहली, सचिन तेंडुलकरसह अनेक सेलिब्रेटींनी केलेल्या ट्वीटचा तपास केला जाणार आहे.

कारण काही सेलिब्रिटींचं ट्विट हे समान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

यादरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. दिल्लीच्या वेशीवर नोव्हेंबर २०२०पासून सुरू असलेल्या तथाकथित शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना,

पर्यावरण कार्यकर्तीचे लेबल लावणारी ग्रेटा थनबर्ग आणि पॉर्नस्टार मिया खलिफाने एकामागोमाग पाठिंबा दिला. त्यानंतर भारतीय क्रीडा आणि कलाक्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांनी आमच्या अंतर्गत प्रश्नात परकीयांनी हस्तक्षेप करू नये,

या आशयाची ट्विट्स केली. भारत सरकार हे प्रकरण सोडवण्यास सक्षम आहे. महाराष्ट्र सरकारने या ट्विटसविरुद्ध इंटेलिजन्स विभागाला तपासाचे आदेश दिले होते.

या ट्वीट्सची तक्रार काँग्रेसने केली होती आणि आरोप केला होता की जास्तकरून ट्वीट्सा पॅटर्न एकसारखाच आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी

काँग्रेसच्या डेलिगेशनला हे आश्वासन दिले की महाराष्ट्र पोलिसांचा इंटेलिजन्स विभाग या ट्वीट्सबाबत तपास करेल आणि अशा प्रकारचे ट्वीट करण्यास भाजपकडून दबाव तर टाकण्यात आला नाही ना याची चौकशी करेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe