कौटुंबिक पेन्शनचा लाभ घेण्यासाठी पतीला दूर सारून मुलगा किंवा मुलीला वारसदार बनवण्याची मुभा महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. सामाजिक व आर्थिक परिणामांचा विचार करून हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत सरकारने सोमवारी अधिकृत निवेदन जारी केले.
मृत्यूपश्चात पतीऐवजी मुलांना पेन्शनचा लाभ द्यावा, असे विनंतीपत्र महिला कर्मचाऱ्याने संबंधित कार्यालय प्रमुखांना द्यावे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल, असे सरकारने निवेदनातून स्पष्ट केले. ‘निवृत्तिवेतन आणि निवृत्तिवेतन धारक कल्याण विभाग’ (डीओपीपीडब्ल्यू) आणि ‘केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम-२०२१’ मध्ये सरकारने एक महत्त्वाचा बदल केला.
त्यामुळे महिला सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना त्यांच्या पात्र व्यक्तींना कौटुंबिक निवृत्तिवेतन मंजूर करता येणार आहे. पतीच्या निधनानंतर मुलांना पेन्शनसाठी वारसदार बनवण्यात येऊ शकते, असे कार्मिक मंत्रालयाने स्पष्ट केले.
वैवाहिक कलहामुळे घटस्फोटाची संतुलित आहार व शारिरीक तंदुरुस्तीसाठी नियमित व्यायामावर भर देण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर मोदींनी पालकांना घरात ‘नो गॅझेट झोन’ आणि ‘भोजनावेळी नो गॅझेट’ सारखे नियम घालून देण्याचा सल्ला दिला. घरातील सर्व मोबाईलचे पासवर्ड एकमेकांकडे देत प्रत्येक सदस्याने पारदर्शक वातावरण निर्माण केल्यास अनेक अडचणी सुटतील, असेही मोदींनी म्हटले.