देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. नेमकं याच पार्श्वभूमीवर आज सोनं आणि चांदीच्या दरातची घट झाली आहे.
सोन्याचा दर ५०० रुपये तर चांदीच्या दरात १७०० रुपयांची घसरण झाली आहे. मुंबईत सोन्याचा भाव ४८ हजार ५०० रुपयांवर आला आहे. तर मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७९१० रुपये झाला आहे.

file photo
त्यात शुक्रवारच्या तुलनेत ५४० रुपयांची घसरण झाली. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८९१० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८१४० रुपये आहे.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. अशातच देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीच्या भावात बदल झालेला दिसून येत आहे. काही प्रमुख शहरातील सोन्याचे दर
- दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८१४० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२५१० रुपये आहे.
- चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६०८० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५०२७० रुपये आहे.
- कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८४१० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१११० रुपये आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved