New Honda Activa Scooter : मस्तच ! फक्त 9000 रुपयांमध्ये घरी आणा Honda Activa चे नवीन मॉडेल; पहा वैशिष्ट्ये…

Ahmednagarlive24 office
Published:

New Honda Activa Scooter : होंडा मोटर्सने नुकतेच Activa स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. Honda Activa स्कूटर पहिल्यापासूनच बाजारात ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. तसेच आता नवीन मॉडेल लॉन्च करून त्यामध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.

कंपनीकडून नवीन स्कूटरला Honda Activa H-Smart असे नाव दिले आहे. या स्कूटरमध्ये कारसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारप्रमाणे स्मार्ट चावी या स्कूटरसाठी देण्यात आली आहे.

चावी न लावता स्कूटर चालू केली जाऊ शकते. तसेच स्कूटर लॉक देखील केली जाऊ शकते. जरी ही स्कूटर कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर ती चोरी केली जाऊ शकत नाही.

नवीन Honda Activa Scooter ३ प्रकारामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. जर तुम्हाला नवीन Honda Activa खरेदी करायची असेल तर तुम्ही ती ९००० रुपयांमध्येच खरेदी करू शकता.

स्कूटर ऑन-रोड किंमत

स्कूटर स्टँडर्ड, डिलक्स आणि एच-स्मार्ट या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. मुख्य वैशिष्ट्य ही स्कूटर फक्त H-Smart प्रकारात उपलब्ध असणार आहे. स्कूटरची ऑन-रोड (दिल्ली) किंमत स्टँडर्ड व्हेरिएंटसाठी रु. 85,298, डिलक्ससाठी रु. 88,027 आणि H-Smart व्हेरियंटसाठी रु. 93,238 आहे.

जर तुम्ही ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट कमी असेल तर ही स्कूटर EMI वर देखील उपलब्ध आहे. 9000 रुपये डाउन पेमेंट करून ३ वर्षाच्या परतफेडीसह तुम्ही स्कूटर खरेदी करू शकता.

दर महिन्याला इतका ईएमआय

Honda Activa स्कूटरची ऑन-रोड (दिल्ली) किंमत रु.85,298 ते रु.93,238 पर्यंत आहे. जर तुम्ही Honda स्कूटरचा टॉप-एंड H-Smart प्रकार खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची सध्या एक्स-शोरूम किंमत 80,537 रुपये आहे.

तुम्ही 93,238 रुपयांच्या अंदाजे ऑन-रोड किमती (दिल्ली) पैकी 9,000 रुपये डाउन पेमेंट म्हणून भरल्यास, तुम्हाला 84,238 रुपये कर्ज घ्यावे लागेल. या रकमेसाठी 3 वर्षांसाठी, तुम्हाला EMI म्हणून 2,718 रुपये द्यावे लागतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe