अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला. भारतातही या महामारीने लोकांना जेरीस आणले आहे. महाराष्ट्र राज्य या रुग्णसंख्येबाबत आघाडीवर आहे.
या आजारापासून रक्षण करण्यासाठी शासनाने, प्रशासनाने घालून दिलॆले नियम पाळणे गरजेचे आहे. पण सुरक्षा पाळत असतानाही जर चुकून कोरोना संक्रमितांच्या संबंधात कुणी आलं तर काही गोष्टी करणे गरजेचे आहे.
जाणून घेऊयात ‘ह्या’विषयी.
१) विलगीकरणात जा – कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यास क्वारटाईन व्हा. कमीतकमी १४ दिवस क्वारंटाईन होणं गरजेचे आहे. या कालावधीत स्वतःला इतर सदस्यांपासून लांब ठेवा.
२) लक्षणांवर लक्ष द्या कोरोनाचं इंन्फेक्शन झाल्यानंतर ताप, सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं, नाकातून पाणी बाहेर येणं, अशा समस्या उद्भवतात. अशा शारीरिक समस्या तुम्हालाही जाणवत असतील तर तपासणी करून घ्या.
३)टेस्ट करा जर तुम्हाला संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याची कल्पना आली असेल तर वेळ न घालवता तपासणी करून घ्या. व्हायरस एका व्यक्तीच्या शरीरातून इतर व्यक्तींच्या शरीरात शिंकण्यातून किंवा खोकण्यातून पसरतो.
४) रोगप्रतिकारक शक्ती वाढवा रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे फार गरजेचे आहे. आहारात हळद, तुळस, लवंग, जायफळ अशा पदार्थांनी तयार केलेल्या काढ्याचे सेवन करा. व्हिटामीन सी, व्हिटामीन डी असलेल्या फळांचे, पदार्थाचे सेवन करा.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com