अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- सध्या देशभरात महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यावर अनेक उपाययोजना अवलंबूनही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण घटताना दिसत नाही.
नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश मधील बलात्कार प्रकरणाने देश हादरला असतानाच पुन्हा एक अशीच क्रूर घटना तेथे घडली आहे. २२ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचं समोर आलं आहे.
पीडित मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. तिच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गंसडी कोतवाली परिसरातील आहे.
दोन मित्रांनी मैत्रीच्या बहाण्याने दलित मुलीला बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. महाविद्यालयातून परतत असताना मुलीचं अपहरण करण्यात आलं आणि गंसडी शहरातील एका खोलीत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला,
असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर त्या मुलीचे कम्बर आणि पाय तोडण्यात आल्याचेही कुटुंबीयांनी म्हटले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
एका आरोपीचे नाव शाहिद आहे. तर दुसऱ्या आरोपीचं नाव साहिल आहे. दोघेही गैंसडीचे राहणारे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved