पायी निघालेल्या मजुरांना चिरडले, 6 जणांचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

मुजफ्फरनगरः कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. यावर पर्याय म्हणून लॉकडाऊन जाहीर केले.

सर्वत्र उद्योग धंदे बंद पडल्याने अनेक मजूर आणि कामगार आपापल्या गावी परतत आहेत.

अशाच पायी गावी परतणार्‍या मजुरांना रोडवेज बसने चिरडले.

गुरुवारी पहाटे उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये घडलेल्या या घटनेत 6 कामगार ठार झाले, तर दोन गंभीर जखमी झाले.

सर्व मजूर पंजाबमध्ये कामाला होते आणि बिहारला जात होते. यातील जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले.

याव्यतिरिक्त जखमी मजुरांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामगार हे बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील रहिवासी असून ते पंजाबहून पायी परतत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment