अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये फेसबुकवरील मैत्रिणीचं ठरलेलं लग्न मोडावं यासाठी एका तरुणाने अतिशय विचित्र पाऊल उचलल्याचं समोर आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि फेसबुकवरील मैत्रिणीचं लग्न ठरल्याने एक तरुण खूपच नाराज झाला. आपल्या या मैत्रिणीचं लग्न मोडावं यासाठी या तरुणाने फेसबुक मैत्रिणीचे एडिटेड अश्लील फोटो हे तिच्या सासरच्या मंडळींना पाठवणं सुरु केलं.
मध्य प्रदेश सायबर पोलिसांनी बोलताना सांगितले की, आरोपीने यासाठी फेक फेसबुक आयडी तयार केलं होतं. याच अकाउंटवरुन तो तरुणीचे फोटो हे एडिट करायचा.
त्यानंतर हे अश्लील फोटो तो तरुणीच्या ठरलेल्या पतीला आणि त्याच्या नातेवाईकांना पाठवायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
इथे एका तरुणीने साबयर क्राईममध्ये तक्रार नोंदवली होती की, कोणीतरी फेक आयडी तयार करुन तिचे अश्लील एडिटेड फोटो फेसबुकवर शेअर करत आहे. तसचं यावर अनेक अश्लील कमेंटही लिहित आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास देखील सुरु केला. यावेळी पोलिसांना अशी माहिती मिळाली की, आरोपीचं नाव प्रशांत रजक असं आहे. जो तक्रारदार तरुणीचा फेसबुकवरील मित्र निघाला, तरुणाने अतिशय विकृत पाऊल उचललं. पण अखेर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला जेलमध्ये पाठवलंच.