दबंगस्टार सलमानला सुरवातीला मिळाले ७५ रुपये मानधन, ‘ह्या’सुपरहिट चित्रपटासाठी केवळ 31 हजार ; जाणून घ्या सलमान बद्दल ‘हे’ काही …

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- दबंग खान अर्थात सलमान खान आज बॉलिवूडमधील सुपरस्टार आहे. सलमानने अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवले आहे. या वर्षांत त्याने एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत.

त्याने माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, करिना कपूर, प्रियांका चोप्रा यांसारख्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत काम केले आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सध्याचा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमधील एक आहे. बिग बॉसच्या एका भागाच्या चित्रीकरणासाठी त्याने ६.५ कोटी रुपये माधन घेतले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सध्या बॉलिवूडचा हा भाईजान जबरदस्त कमाई करत आहे. त्याच्या नावावरच अनेक पिक्चर हिट होतात. आज बॉलिवूडवर दबंग खान राज्य करत आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

असं असलं तरी सलमानचा पहिला पगार किती होता, याबद्दल त्यानं नुकताच खुलासा केलाय. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत सलमानचं नाव आहे. १९८८ मध्ये सलमाननं इन्डस्ट्रीत अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली, हे सर्वांनाच माहिती आहे.

पण त्यापूर्वी सलानला एका कामासाठी ७५ रुपयांचा चेक मिळाला होता. PTI ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं यासंदर्भात खुलासा केला. एका इव्हेंटमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून सलमानला हे पैसे मिळाले होते. याचा खुलासा स्वतः सलमान खानने एका मुलाखतीत केला आहे.

त्यानंतर एक सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातीसाठी सलमानला ७५० रुपये मिळाले होते. त्यामध्ये वाढ होत सलमानला १५०० रुपये मिळाले होते. ‘मैने प्यार किया’ चित्रपटासाठी सलमानला ३१००० रुपये मानधान देण्याचं ठरलं होतं. मात्र, नंतर त्याव वाढ करण्यात आली आणि ते ७५००० रुपये करण्यात आल्याचं सलमान खान याने सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe