अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- भारतातील कोविडची रुग्ण संख्या सध्या नियंत्रणात असली तरी जगातील इतर देशांमध्ये ही परिस्थिती नाही. विशेषतः युरोपियन देशांमध्ये नवीन कोविड रुग्णांच्या संखेने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
चीन असो वा पाश्चात्य देश, कोविडचा हाहाकार पहायला मिळतोय, ज्यामुळे तिथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम युरोपच्या देशांमध्ये, अमेरीकेत आणि काही आणखी देशांमध्ये कोविडची नवीन लाट आलीये आणि रूग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात अशा देशांचाही समावेश आहे जिथे 70 टक्के किंवा त्याहून जास्त लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चेतावणी दिली आहे की युरोप पुन्हा एकदा कोविड महामारीचं केंद्र बनलं आहे आणि फेब्रुवारीपर्यंत आणखी 5 लाख मृत्यू होऊ शकतात, अशी भिती व्यक्त केली आहे.
WHO, केंद्र सरकार आणि आरोग्य तज्ञांनी भारतात कोविडच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. भारतात सध्या कोविडची परिस्थिती नियंत्रणात असली तरी रुग्ण संख्या वाढण्याचा धोका टळलेला नाही.
आता सरकार पुन्हा सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सामान्यपणे सुरू करणार आहे. हे आवश्यक आहे कारण बरेच लोक वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत. पण कोविडची पाश्चात्य देशांमधली भयंकर परिस्थिती पाहता भारतीयांनी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, हे नक्की.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम