अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-रानू मंडल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्या लता मंगेशकर यांचं गाणं गात होत्या.
विशेष म्हणजे त्यांचा हा व्हिडीओ पाहून त्या एका रात्रीत प्रकाशझोतात आल्या होत्या. राणू एका रात्रीत स्टार झाली. इतकंच नाही तर त्यांनी अभिनेता, गायक आणि दिग्दर्शक हिमेश रेशमियाच्या चित्रपटासाठीदेखील गाणी गायली आहेत.
डोक्यावर छप्पर नसताना, कुणाचाही आधार नसताना केवळ सुरेल आवाजाच्या जोरावर सोशल मीडियाद्वारे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल सध्या काय करतायेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
रानू मंडलचं गाणं रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण झालं. त्यानंतर ती गायब झाली. पण आता रानू मंडलच्या चाहत्यांसाठी खूषखबर आहे.
रानू मंडल आता बंगाली गायक रूपांकर बागची होस्ट करत असलेल्या एका शोमध्ये दिसणार आहे. या शोचा टीझर नुकताच रिलीज झालाय. या टिझरमध्ये रानू सागर किनारे हे गाणं गाताना दिसणार आहे.
रानू आणि रूपांकर २ जानेवारीला एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एक शो करताना दिसणार आहे. या दोघांमध्ये सुरांची मैफील रंगणार आहे.सध्या राणूला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com