Indian Railway Night Rules : रात्रीच्या वेळी रेल्वेने प्रवास करताना करू नका या चुका अन्यथा होईल मोठा दंड

Indian Railway Night Rules : भारतीय रेल्वे ही भारताची दळणवळणाची जीवनदायिनी आहे असे म्हंटले जाते. भारतीय रेल्वेने लाखो प्रवासी प्रवास करत असतात. तसेच भारतीय रेल्वेकडून देखील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी रेल्वे विभागाकडून अनेकवेळा नियमांमध्ये बदल केला जातो. रेल्वेने दिवसा प्रवास करण्याचे नियम वेगळे आणि आणि रात्री प्रवास करण्याचे नियम वेगळे आहेत.

जर रेल्वे बिभागाकडून जारी करण्यात आलेल्या नियमांचे कोणी उल्लंघन केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच काही वेळा तुम्हाला शिक्षा देखील केली जाऊ शकते. त्यामुळे रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करणे तुमच्या अंगलट येऊ शकते.

जर तुम्ही रात्रीच्या वेळी रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण रेल्वे विभागाकडून रेतीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. जर तुम्हाला हे नियम माहिती नसतील तर माहिती करून घेणे गरजेचे आहे.

भारतीय रेल्वेच्या नव्या नियमानुसार रात्री १० वाजल्यानंतर चालत्या ट्रेनमध्ये एखादा प्रवासी आवाज करताना, गाणी वाजवताना, जोरात बोलताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

दुसरीकडे, रेल्वेने टीटीई, बोर्डिंग स्टाफ, कॅटरिंग कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना यामध्ये सहकार्य करण्यास सांगितले आहे. भारतीय रेल्वेने रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी कोणते नियम ठरवले आहेत ते जाणून घेऊया.

रेल्वेने रात्री प्रवासाचे नवीन नियम

रात्रीच्या वेळी कोणीही मोबाईलवर मोठ्याने बोलू शकत नाही.
मोठ्या आवाजात गाणी ऐकण्यास मनाई आहे.
ट्रेनचा दिवा सोडला तर रात्री 10 वाजल्यानंतर इतर कोणताही दिवा लावण्याची परवानगी नाही.
टीटीई रात्री १० नंतर तिकीट तपासू शकत नाही.
गटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री १० नंतर बोलता येणार नाही.
रात्री 10 वाजल्यानंतर ऑनलाइन अन्न वितरणास मनाई आहे.
ट्रेनमध्ये धूम्रपान, मद्यपान करण्यास मनाई आहे.
लाइटर, माचीस किंवा कोणत्याही ज्वलनशील पदार्थांना परवानगी नाही

हा नियम मधल्या सीटसाठी

दुसरीकडे, 10 वाजल्यानंतर जर एखादा प्रवासी खालच्या सीटवर बसला असेल, तर तो काढून तुम्ही मधले सीट उघडू शकता. यासाठी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत मधले सीट उघडण्याचा नियम आहे. यासाठी तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe