डाॅ. चित्तरंजन भावे मृत्यूप्रकरणाबद्दल IMA चा खुलासा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :  कोरोना रुग्णांची सेवा करताना मुंबईतील डॉ. चित्तरंजन भावे यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर विविध बातम्या त्यांच्या मृत्यूबाबत पसरल्या. मात्र आता इंडियन मेडिकल असोसिएशनने याबाबत एक खुलासा केला आहे.

कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. चित्तरंजन भावे मुंबईतील रहेजा रुग्णालयात कोरोना रुग्णांना उपचार देत होते. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांनाही कोरोनाव्हायरसची लागण झाली.

त्यानंतर ते रहेजा रुग्णालयातच दाखल झाले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सुरुवातीला 4 दिवस वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

त्यानंतर त्यांच्या शरीरात ऑक्सिजनमध्ये कमतरता झाली तसं त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. त्यांना वेंटिलेटरवर ठेवलं गेलं. त्यांच्या किडनीवर ताण पडला होता, त्यांचं डायलिसिसही करण्यात आलं मात्र त्यांचं यात निधन झालं.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं, डॉ. चित्तरंजन भावे यांना मधुमेह होता. हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती, स्टेंट बसवलेले होते. तरी ते कोरोना रुग्णांवर उपचार करत होते.

शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना कोरोना आजाराचा संसर्ग झाला. मुंबईतील रहेजा रुग्णालयात ते मानद शल्यक्रिया तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते.

जेव्हा त्यांना आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं तेव्हा त्याच रुग्णालयात दाखल होण्यासाठी त्यांनी रुग्णालयाला फोन केला.

मात्र रुग्णालयात जागा नसल्याने ते घरीच थांबले. जेव्हा रुग्णालयात जागा रिकामी झाल्याचं त्यांना कळलं तेव्हा ते स्वत: रुग्णालयात गेले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment