अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- वर्षभर सहज उपलब्ध असणारे फळ म्हणजे ‘डाळींब’. हे फळ खाल्ल्याने अनेक आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. चला, तर आज डाळिंब खाण्याचे फायदे पाहुयात.
डाळींब खाल्ल्याने उष्णता कमी होते.डाळिंबा ज्यूस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये मोठ्याप्रमाणात लोह आहे. त्यामुळे रक्ताची कमतरता जाणवत असेल तर रोज डाळिंबाचा ज्यूस घ्यावा.डाळींब शरीरातील इम्युन सिस्टम मजबूत करते.
त्यामुळे सध्याच्या संक्रमणाच्या काळात डाळींब खावे किंवा ज्यूस घ्यावे. डाळींबमध्ये मॅग्नेशियमची मात्रा बऱ्यापैकी आहे, जे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.अपचन, पोटात गॅस होणे, शैचास साफ न होणे यावेळी डाळींब फायदेशीर ठरते.तोडांस दुर्गंधी येत असेल तर डाळींबाचे दाणे चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते.
जुलाब होत असल्यास डाळींब खावे किंवा ज्यूस प्यावे. नियमित डाळींब खाल्यास त्वचा तजेलदार राहते.डाळींब शरीरासाठी चांगले असते. डाळींब खाल्याने आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते. डाळींब हे फळ सहज मिळत असल्यामुळे त्याचे फायदेही अनेक आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved