भारताची लस मिळवण्यासाठी केले बाकीच्या देशांनी प्रयत्न; नेमके असे काय आहे त्यात

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-सध्या कोरोना ने जगात थैमान घातले आहे. काही देशांमध्ये पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. अशा मध्येच चीन व रशिया यांनी काही लसींना मान्यता देऊन टाकली आहे आणि त्यांच्या देशात लसीकरण सुरु झाले आहे.

परंतु या देशांवर बाकीचे देश भरोसा ठेवायच्या स्थितीत नाही आहे. सगळे देश या दोन्ही देशांकडे संशयाच्या नजरेने पाहत आहे. या मुळे कोणी सुद्धा या देशांची लस घेण्यासाठी तयार नाहीये.

अशातच भारतात भारत बायोटेक व सिरम इन्स्टिट्यूट बनवत असलेल्या लसांकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. या दोन्ही संस्थांनी WHO च्या गाइडलाइन्स पाळून लस बनवली आहे व लवकरच त्यांना मान्यता मिळणार आहे.

भारतात लवकरच लसीकरणाला सुरुवात होणार आहे. अशातच आता सगळे देश भारताकडे एक आशेचा किरण लावून बघत आहे. भारताच्या लसींवर सगळ्यांचा विश्वास आहे.

भारत आता जगासाठी आशास्थान बनले आहे. भारताने या आधी hydroxocholorqquine चा १५० देशांना मोठ्या प्रमाणात पुरवठा केला होता. मध्य आशिया मधील देशांनाही हि लस हवी असल्याने आता भारताने मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्या साठी तयारी सुरु केली आहे.