Electric Scooter : भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मात्र आता पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करत आहेत. जर तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली तर तुमची पेट्रोलपासून मुक्तता होईल.
भारतातील ऑटो क्षेत्रात अनेक कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने लॉन्च झाली आहेत. तसेच भारतात आजही एका जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटरची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये ८५ किमी चे मायलेज देत आहेत.
Bounce Infinity E1 लिमिटेड एडिशन ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १ लाखांपेक्षा कमी आहे. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.
बाउन्स इन्फिनिटी E1 ची भारतात किंमत
या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 47,499 रुपये आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटरचे टॉप व्हेरिएंट घ्यायचे असेल, तर तुम्हाला ते 96,799 रुपयांमध्ये मिळेल.
रेंज आणि टॉप स्पीड
प्रत्येक कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वेगवेगळी फीचर्स देण्यात येतात. तसेच मायलेजच्या बाबतीत सर्वच कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर वेगवेगळ्या आहेत. बाउन्स इन्फिनिटी E1 इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 85 किलोमीटरपर्यंतची रेंज देते असा कंपनीचा दावा आहे. तसेच टॉप स्पीड 65 किमी/तास आहे.
वैशिष्ट्ये
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल घड्याळ, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, पुश बटण स्टार्ट, जिओ फेन्सिंग, अँटी थेफ्ट अलार्म, क्रूझ कंट्रोल, ईबीएस, ड्रॅग मोड, 2 ड्राइव्ह मोड, लोकेशन ट्रॅकिंग या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
समाविष्ट आहेत. टो अलर्ट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प, एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाइट, लो-बॅटरी इंडिकेटर यासारखी उत्कृष्ट वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. ही इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमधील अनेक इलेक्ट्रिक स्कॉटर्स टक्कर देईल.