EPFO : सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचारी हे पेन्शन योजनेस पात्र असतात. पण खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये खाते असणे अनिवार्य आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या काही टक्के रक्कम कापली जाते.
याच कापलेल्या रकमेचा कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर खूप फायदा होत असतो. कर्मचारी एखाद्या खाजगी क्षेत्रात काम करत असेल तर तो कर्मचारी भविष्य निधी संघटना या योजनेत खाते उघडू शकतो.

नोकरी करत असताना अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही ठराविक रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या स्वरूपात जमा केली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना या रकमेचा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळण्यात फायदा होत असतो.
नोकरी करत असताना कर्मचाऱ्यांच्या पगारातून वजा केलेली रक्कम त्यांना सेवानिवृत्तीनंतर दिली जाते. तसेच जेवढी रक्कम कर्मचाऱ्याच्या पगारातून वजा केली जाते तेव्हडीच रक्कम सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या EPF खात्यात जमा केली जाते.
कर्मचार्यांना कायद्यानुसार त्यांच्या मूळ मासिक पगाराच्या 12% आणि EPF मध्ये स्थगिती भरपाई देणे आवश्यक आहे. त्यानंतर नियोक्त्याला असेच योगदान देण्यास सांगितले जाते. तसेच कर्मचारी त्यांच्या EPF खात्यामध्ये दरवर्षी किमान ५०० ते कमाल १.५ लाख रुपये गुंतवू शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या करातही बचत होत असते.
UAN द्वारे ओळखल्या गेलेल्या कर्मचारी आणि नियोक्ता दोघांची कायमस्वरूपी खात्यात जमा केलेली रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या देखरेखेखाली असते. ईपीएफ कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्ही तुमच्या बचतीची अचूक गणना करू शकता.
ईपीएफ कॅल्क्युलेटर कसे वापरावे?
तुमचा मूळ पगार आणि तुमचे वय प्रविष्ट करा.
नियोक्त्याचे योगदान (EPS+EPF), एकूण मिळविलेले व्याज आणि एकूण परिपक्वता रक्कम सर्व निकालांमध्ये दर्शविली जाईल.
ईपीएफ कॅल्क्युलेटर कसे काम करते?
कर्मचारी दरमहा त्याच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या १२% रक्कम ईपीएफ खात्यात भरतो. उदाहरणार्थ, कर्मचार्याचे योगदान 60,000 रुपयांच्या 12% असेल (कोणतेही DA नाही असे गृहीत धरून), कर्मचार्याचे EPF मधील योगदान 7,200 रुपये असेल.