‘अटक तर त्यांचा बापही मला करु शकत नाही’

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- रामदेवबाबा यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर लिहिल्या जात आहेत. दरम्यान, रामदेवबाबांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओवरूनदेखील रामदेवबाबा यांच्यावर टीका होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते आपल्या अटकेबाबत म्हणाले, “अटक तर त्यांचा बाप सुद्धा करू शकत नाही.” हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ कधीचा आहे.

याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ ट्विट करुन नेटकऱ्यांनी रामदेवबाबा यांना लक्ष्य केले आहे. रामदेवबाबा म्हणाले, लोक कधीकधी रामदेवबाबा यांना अटक करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर चालवतात तर कधी रामदेवबाबा ठग असल्याचे ट्रेंड चालवतात.

चालू द्या, पण आता आपण हे गुण देखील शिकलो आहोत आणि आम्ही जे लोकं जो ट्रेंड चालवितो तो देखील शीर्षस्थानी असतो. रामदेवबाबा यांच्या या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी केंद्र सरकारलाही ट्रोल केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News