खळबळजनक ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- एका कन्नड अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड अभिनेत्री सौजन्याने आत्महत्या केली आहे. गळफास घेऊन तिने आयुष्याचा शेवट केला आहे.

सौजन्या कन्नड टीव्ही अभिनेत्री आहे. टीव्ही सीरिअलसह तिने काही साऊथ फिल्ममध्येही काम केलं आहे. बंगळुरूतल्या कुंबलगोडूत ती राहत होती. तिच्या बंगळुरूतील राहत्या घरात तिचा मृतदेह सापडला आहे.

लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह होता. तिच्या खोलीत सुसाइड नोटही सापडली आहे. सुसाईड नोटमध्ये तिने आपल्या आत्महत्येसाठी कुणीही जबाबदार नाही हे नमूद केलं आहे.

पण आपण उचलेल्या या पावलामुळे तिने आपल्या कुटुंबाची विशेषतः आईवडीलांची माफी मागितली आहे. तर तिच्या वाईट वेळेत तिची साथ देणाऱ्यांचे आभार मानले आहेच. तसंच यामध्ये तिने ती डिप्रेशनमध्ये असल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणी आता पोलीस तपास सुरू झाला आहे. .

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe