सोन्याचांदीच्या किंमतींमध्ये घसरण , जाणून घ्या आजचे दर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-आज सलग चौथ्या दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमती कमी झाल्याने देशांतर्गत बाजारातही किंमती उतरल्या आहेत.

याशिवाय कोरोना व्हॅक्सिनबाबत सकारात्मक बातम्या समोर आल्याने सोन्याच्या किंमतीवरील दबाव वाढत आहे. अमेरिकेत स्टिम्यूलस पॅकेजची घोषणा झाली आणि डॉलरचे मुल्य कमी झाले तर सोन्याचे भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे.

आज सोन्याचे दर कमी झाले आहेत. त्याचप्रमाणे भारतातही या मौल्यवान धातूंच्या किंमती उतरल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात खरेदीदारांसमोर सोनं खरेदी करण्याची संधी आहे.

देशांतर्गत बाजारात गुरुवारी देखील सोन्याचांदीच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. गुरुवारी 10 डिसेंबर 2020 रोजी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 534 रुपये प्रति तोळांंनी कमी झाले आहेत.

तर चांदीचे दरही आज उतरले आहेत. एक किलो चांदीच्या दरात 628 रुपयांची घसरण झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 49,186 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते.

तर चांदीचे दर 63,339 रुपये प्रति किलो होते. जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचांदीच्या दरात घसरण झाल्याने भारतात सोन्याचांदीचे दर कमी झाले आहेत.

सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे दर 534 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. यानंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर 48,652 रुपये प्रति तोळा झाले आहेत.

याआधीच्या सत्रात सोन्याचे दर 49,186 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,835 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!