1 जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य पण ते कोठून काढावे? कोणत्या कागदपत्रांची असेल आवश्यकता? जाणून घ्या सर्व माहिती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) 25 डिसेंबर रोजी माहिती दिली की, फास्टॅगच्या माध्यमातून 24 डिसेंबर रोजी टोल संकलन विक्रमी पातळीवर पोहोचले.

24 डिसेंबर रोजी फास्टॅगच्या माध्यमातून 80 कोटींपेक्षा जास्त टोल वसुली करण्यात आली. आता दररोज 50 लाखाहून अधिक व्यवहार केले जात आहेत.

आतापर्यंत 2.20 कोटी फास्टॅग इश्यू करण्यात आले आहेत, परंतु काही दिवसांत त्यांची संख्या वाढणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

पुढच्या वर्षी 1 एप्रिल 2021 पासून फास्टॅग नसेल थर्ड पार्टी विमा देखील शक्य होणार नाही. 1 जानेवारीला आता फक्त काही दिवस बाकी आहेत,

अशा परिस्थितीत कोणतीही समस्या टाळण्यासाठी लवकरात लवकर फास्टॅग लावणे आवश्यक आहे. हे फास्टॅग कोठून घ्यावे ? कसे घ्यावे? आवश्यक कागदपत्रे आदींविषयी माहिती जाणून घेऊयात ..

येथून आपण फास्टॅग घेऊ शकतो

  • – टोल प्लाजा
  • – राष्ट्रीय राजमार्गावरील पेट्रोल पंप
  • – आरटीओ
  • – एनएचएआय ऑफिस
  • – ई-कॉमर्स वेबसाइट , उदा . अमेझॉन , फ्लिपकार्ट, पेटीएम आदी
  • – बॅंक्स (आयसीआयसीआय, एचडीएफसी, एक्सिस आदी)
  • – मोबाइल बँकिंग ऍप्स
  • – माय फास्टैग ऍप्स, सुखद यात्रा ऍप
  • – एनएचएआई, आईएचएमसीएल, एनपीसीआई वेबसाइट्स

या कागदपत्रांची आवश्यकता असेल :- फास्टॅग खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या कागदपत्रांची प्रत त्याच्या अर्जासोबत द्यावी लागेल.

  • – आरसी (नोंदणी प्रमाणपत्र)
  • – वाहन मालकाचे केवायसीची कागदपत्रे
  • – या दोन कागदपत्रांव्यतिरिक्त व्यक्तीला आयडी प्रूफ आणि पत्ता पुरावा देण्यासाठी खालील कागदपत्रांची प्रत द्यावी लागेल आणि पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल.
  • – ड्राइविंग लाइसेंस
  • – वोटर आईडी कार्ड
  • – पॅन कार्ड
  • – आधार कार्ड (पत्त्यासह) – पासपोर्ट
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment