बापाचा मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; बायकोने केली हत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- सावत्र मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या माणसाचा त्याच्या बायकोने गळा घोटून हत्या केल्याची घटना घडली आहे. राजकिशोर असं मृत व्यक्तीच नाव असून ही घटना पंजाबमध्ये घडली.

राजकिशोर पंजाब येथील लुधियानामध्ये राहत होता. त्याच याचं लग्न गीता नावाच्या महिलेशी झालं होतं. तिचं हे दुसरं लग्न आहे. गीताच्या पहिल्या लग्नाची दोन मुलंही त्यांच्यासोबत राहत होती.

शनिवारी राजकिशोर रात्री दारू पिऊन घरी आला होता. घरी आल्यावर त्याने त्याच्या 15 वर्षांच्या सावत्र मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

तिने विरोध केल्यानंतर त्याने तिला मारहाणही केली. गीतानेही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायला तयार नव्हता.

अखेर या झटापटीत गीताने राजकिशोरचा गळा आवळला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. गीताने त्वरित पोलीस स्टेशन गाठून गुन्हा कबूल केला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment