कोरोनाशी लढा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला हा आदेश !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उपचारासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा निर्माण होऊ देऊ नका, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिले आहेत.

याचवेळी कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे देशभरातील रुग्णालये, वैद्यकीय सामग्री, मास्क, व्हेंटिलेटर आणि वैयक्तिक सुविधा परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

कोविड-१९ च्या आव्हानाचा सामना करण्याच्या अनुषंगाने नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी स्थापन झालेल्या अधिकारसंपन्न समूहांची संयुक्त बैठक नवी दिल्ली येथे घेतली.

यावेळी देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि भविष्यातील धोक्यांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. मास्क, हँडग्लोज, व्हेंटिलेटर, व्यक्तिगत सुरक्षा उपकरणांसह सर्वच वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा निर्माण होऊ देऊ नका, असे निर्देश मोदींनी दिले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विटनुसार, कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे देशभरातील रुग्णालयांची संख्या, अलगीकरण व विलगीकरण उपचारपद्धती, कोरोना चाचणी व देखरेख प्रशिक्षण आदींच्या तयारीची मोदींनी समीक्षा केली आहे.

 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment