Electric Scooter : फ्लिपकार्टची भन्नाट ऑफर ! 1 लाखांची इलेक्ट्रिक स्कूटर मिळतेय फक्त 19,167 रुपयांमध्ये, आजच करा संधीच सोनं

Ahmednagarlive24 office
Published:

Electric Scooter : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर खूपच वाढल्याने अनेकजण इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहे. मात्र या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अधिक असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही.

मात्र जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण फ्लिपकार्टवर एका इलेक्ट्रिक स्कूटरवर भन्नाट ऑफर दिली जात आहे. या ऑफरमुळे तुमच्या पशांची मोठी बचत होत आहे.

फ्लिपकार्टवर इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 19167 रुपयांमध्ये ऑफरसहित देण्यात येत आहे. त्यामुळे जर तुम्ही स्कूटर घेत असाल तर नक्कीच फ्लिपकार्टच्या ही ऑफर एकदा पहा. यामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल.

Bgauss BG D15 Pro इलेक्ट्रिक स्कूटर

फ्लिपकार्टवर Bgauss BG D15 Pro या इलेक्ट्रिक स्कूटरवर ऑफर देण्यात येत आहे. या स्कूटरची खरी किंमत 1,14,999 रुपये आहे. मात्र ही स्कूटर फ्लिपकार्टवर अवघ्या काही हजारांमध्ये मिळत आहे.

असा घ्या ऑफरचा लाभ

Bgauss BG D15 Pro या इलेक्ट्रिक स्कूटरवर ऑफर ठेवली आहे. जर तुमच्याकडे Axis Bank क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. तसेच कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे तुम्हाला 10% सूट मिळू शकते.

याशिवाय फ्लिपकार्टकडून जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात विशेष कूपन कॅशबॅक देखील दिला जात आहे. कोटक डेबिट कार्ड्सवर 5000 रुपये आणि कोटक क्रेडिट कार्ड्सवर 4000 रुपयांची विशेष सूट दिली जात आहे. तुम्ही ही स्कूटर फक्त 19167 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन जाऊ शकता.

वैशिष्ट्ये

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक दमदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 115 किलोमीटरपर्यंत धावेल. तसेच ही स्कूटर ताशी 60 किलोमीटर वेगाने धावू शकते. या स्कूटरमध्ये लिथियम आयन बॅटरीचा पर्याय देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe