Queen Elizabeth : ब्रिटनच्या महाराणी एलिथाबेथ द्वितीय निधन झाले आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून रविवारी (११ सप्टेंबर) भारतात देशभर एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे.
त्यामुळे देशभरातील सरकारी आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राणी एलिझाबेथ यांच्या सन्मानार्थ भारतातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार आहेत.

महाराणीवर अंत्यसंस्कार त्यांच्या मृत्यूनंतर दहा दिवसांनी होणार आहेत. ब्रिटनमध्ये अंत्यसंस्काराचा दिवस राष्ट्रीय दुखवटा दिवस असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या महाराणीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
त्या आमच्या काळातील दिग्गज म्हणून स्मरणात राहतील. त्यांनी आपल्या देशाला आणि लोकांना प्रेरणादायी नेतृत्व दिले. सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रतिष्ठा आणि सभ्यता दाखवली, अशा शब्दात मोदींनी शोक व्यक्त केला.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने रविवारी मुंबईत राजभवन येथे आयोजित केलेला भारताचे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सत्कार समारंभ पुढे ढकलण्यात आलेला आहे.