Ahmedabad Plane Crash मध्ये माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे दु:खद निधन

Published on -

अहमदाबादहून एक गंभीर आणि दु:खद घटना समोर आली आहे. गुजसेल विमानतळावर एअर इंडियाचे एक विमान कोसळल्याची माहिती नुकतीच प्राप्त झाली आहे. या दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृह राज्यमंत्री हर्ष संघवी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.

या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे दु:खद निधन झाले आहे, विमानतळावर मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, अग्निशमन दल आणि बचाव पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत.

एअर इंडियाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या अपघातात एकूण १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन वैमानिकांसह २५ प्रवासी समाविष्ट आहेत. दुर्घटनास्थळी मदत कार्यासाठी वडोदऱ्यातून २५ अग्निशमन कर्मचारी आणि २०० बचाव कर्मचारी अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.

या विमानात एकूण ५३ ब्रिटिश नागरिक होते, आणि दुर्घटनेनंतर ब्रिटन सरकारने या नागरिकांना तत्काळ कॉन्सुलर मदत पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून,

ब्रिटिश प्रशासन भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे.राज्याचे आरोग्यमंत्री हृषिकेश पटेल यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू असून, संपूर्ण प्रशासन या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहे.

लंडन प्रवासाचे कारण

अहवालानुसार, विजय रूपाणी यांची पत्नी अंजली रूपाणी सध्या लंडनमध्ये आहेत आणि ते त्यांना परत आणण्यासाठी लंडनला निघाले होते, असे सांगितले जात आहे. माजी मंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा यांनी सांगितले की, ते एका कार्यक्रमासाठी गुजरात विद्यापीठात उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर जेवण करत असताना त्यांनी टीव्ही सुरू केला, आणि त्यांना अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या विमानाच्या अपघाताची बातमी समजली.

त्याचवेळी त्यांना आठवले की विजय रूपाणी हे त्याच विमानाने लंडनकडे जाणार होते, पण ते प्रत्यक्षात विमानात होते की नाही याची खात्री नव्हती. त्यामुळे त्यांनी लगेचच टीव्ही बंद केला आणि रूपाणी यांच्या गांधीनगरमधील निवासस्थानी पोहोचले. त्यांच्या प्रवासासाठी दिलेला सीट क्रमांक २डी असल्याचे सांगितले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News