हास्यास्पद … आरोग्य सेतू App बनवले कुणी? सरकारलाही माहिती नाही !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील कोट्यवधी मोबाइलमध्ये डाऊनलोड झालेले आरोग्य सेतू हे App नेमके कुणी बनवले, ही माहितीच सरकारकडे उपलब्ध नाही.

केंद्रीय माहिती आयोगाने मंगळवारी हा प्रश्न उपस्थित केला आहे. या काँटॅक्ट ट्रेसिंग App बद्दल माहिती अधिकारात विचारल्या गेलेल्या उत्तराला समाधानकारक उत्तर दिले गेलेले नसल्याने माहिती आयोगाने नॅशनल इन्फरमेटिक सेंटरला (एनआयसी) जाब विचारला आहे.

या App च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे App एनआयसी आणि आयटी मंत्रालयाने डेव्हलप केले होते. परंतु, याच संदर्भात आरटीआयद्वारे विचारण्यात आलेल्या एका अर्जाला उत्तर देताना मात्र App च्या डेव्हलपमेंटबद्दल आपल्याकडे माहिती नसल्याचे उत्तर एनआयसीने दिले आहे.

त्यानंतर केंद्रीय माहिती आयाेगाने एनआयसीला कारणे दाखवा नोटीस बजावली. दरम्यान, या नोटिशीनंतर केंद्र सरकारने हे App अत्यंत पारदर्शी पद्धतीने तयार करण्यात आले असल्याचा खुलासा केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment